Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उत्तर महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन अध्यक्ष पदी नदीम शेख तर जिल्हाध्यक्षपदी हर्षल पाटील नियुक्ती

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशानुसार पाचोरा तेथील रहिवासी असलेले नदीम शकील शेख यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी व हर्षल पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नदीम शेख व हर्षल पाटील यांनी या अगोदर पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष पद तसेच पाचोरा तालुका अध्यक्ष पद भूषविले होते त्यामुळे पोलीसांसाठी आजवर त्यांनी केलेली कामे पाहता संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी नदीम शेख यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी तर हर्षल पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. नदीम शेख व हर्षल पाटील यांच्या निवडीबद्दल जळगाव, नाशिक, मालेगाव, धुळे आदी जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. नदीम शेख व हर्षल पाटील यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version