Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात सोमवारी ‘नो व्हेईकल डे !’

अमळनेर प्रतिनिधी । राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्यात येत असून या अभियानातर्गत शहरात एक दिवस ‘नो व्हेईकल दिन’ पाळण्यात यावे असे आवाहन अमळनेर नगरपालिके मार्फत करण्यात आले असून शहरात येत्या सोमवारी ‘नो व्हेईकल’ दिवस पाळण्यात येणार आहे.  राज्यात गेल्या काही दिवसापासून प्रदूषण मुक्त महाराष्ट्र होण्यासाठी माझी वसुंधरा ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.त्या अनुषंगाने अमळनेर नगर परिषदेमार्फत अमळनेर शहर माझी वसुंधरा ही मोहित यशस्वीपणे राबवून शहर पर्यावरण पूरक उपक्रम,स्वच्छ व सुंदर शहराची निर्मिती तसेच प्रदूषण मुक्त हवेच्या उपलब्धतेसाठी ही हरित संकल्पना राबवित असून ही मोहीम यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील नागरिक, सर्व कार्यालयातील कर्मचारी,व्यापारी,उद्योजक यांनी सोमवार 7 डिसेंबर रोजी नागरिकांनी ‘नो व्हेईकल’ दिवस पाळून सायकल किंवा पायी फिरण्याचे आवाहन नगरपरिषदेचे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, सर्व समिती सभापती,नगरसेवक व नगरसेविका यांनी केले आहे.

Exit mobile version