Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बकरी ईदला ‘कुर्बानी’ नाही : पारोळ्यात मुस्लीम समुदायाचा निर्णय

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यंदा बकरी ईदच्याच दिवशी आषाढी एकादशी येत असल्याने प्राण्यांची कुर्बानी न देण्याचा निर्णय येथील मुस्लीम समाजबांधवांनी घेतला आहे.

पारोळा पोलीस स्टेशन येथे आगामी बकरी ईद व आषाढी एकादशी या सणांच्या अनुषंगाने पो स्टे हद्दीतील कुरेशी /खाटीक समाजाची व मस्जिद प्रमुख ,मौलाना यांची काल सायंकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकिस शमशोद्दीन मौलान, अजीज मोहम्मद मन्सुरी, शेख जुबेर शेख गफ्फार, शेख नुरुद्दीन शेख अल्लाउद्दीन, सिकंदरखान बाबेखान पठाण, मोहम्मद पठाण, मौलाना युसूफ नुरमोहम्मद, हाजी युसुफ, जुबेर अहमद शेख मोहम्मद खाटीक असे बैठकिस उपस्थित होते.

या बैठकीत कोणत्याही घटनांमुळे सामाजिक/ धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे निर्देश देण्यात आले. दरम्यान, कुठलेही गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करण्यास सक्त मनाई असुन कोणीही कोणत्याही समाजाच्या/ धर्माच्या भावना दुखावतील असे कॄत्य करणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या.

यावर उपस्थित कुरेशी,मौलाना व प्रतिष्ठीत मुस्लिम मान्यवरांनी बकरी ईद चे दिवशी हिंदू धर्मियांची आषाढी एकादशी येत असल्याने आम्ही कोणत्याही प्रकारची कुर्बानी देणार नसल्याची ग्वाही दिली. तसेच कोणताही कायदा व सुव्यवसस्थेचा प्रश्न होणार नाही,पोलिसांना सहकार्य करू असे आश्‍वासन देखील समुदायाच्या वतीने देण्यात आले. या बैठकीला डीवायएसपी सुनील नंदवाळकर व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी मार्गदर्शन केले.

Exit mobile version