Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एअर स्ट्राइकचे राजकीय फायद्यासाठी कोणीही श्रेय घेऊ नये : नितीन गडकरी

nitin gadkari

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकचा मुद्दा लोकसभा निवडणुकीशी जोडला जाऊ नये, इतकचं नाही तर राजकीय फायद्यासाठी याचे श्रेय घेण्याची गरज नाही,असे मतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

 

एका वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले की, पंतप्रधान पदासाठी मी दावेदार नाही तसेच मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पण नाही. नरेंद्र मोदी यांना मोठ्या प्रमाणात जनमत मिळत असून ते पुन्हा पंतप्रधान होतील. त्याचसोबत पाकिस्तानच्या विरोधातील कारवाईला निवडणुकांशी जोडले नाही पाहिजे किंवा प्रचारासाठी याचा मुद्दा म्हणून वापर करु नये. विरोधी पक्ष यावर शंका उपस्थित करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी त्यांना आवाहन करेल की या मुद्द्यावर राजकारण करु नका. मात्र सत्ताधारी पक्षाकडूनच प्रचारात या मुद्द्याचा वापर केला जातोय या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी उत्तर दिले की, सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आाहे. या मुद्द्यावर कोणीही राजकारण करु नये.

Exit mobile version