Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विराट नाही मोडू शकत, सचिनचा विक्रम : सेहवाग

virat 2

नवी दिल्ली प्रतिनिधी । विक्रमवीर विराट कोहली सध्या फार्मात आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरप्रमाणे कोहलीही विक्रमांचे शिखर सर करत आहे. कोहली या पिढीतील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. मात्र, सचिनचा एक विक्रम तो मोडू शकत नाही, असं सेहवाग म्हणाला.

सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सेहवागनं अलीकडेच एका मुलाखत म्हणाला की, यावेळी त्याने कोहलीवर स्तुतीवर्षाव केला. आजच्या घडीला कोहली हा जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. तो सातत्यानं धावा काढत आहे. सचिनचे बहुतांश विक्रम तो मोडेल असं सध्या तरी दिसते आहे. भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागनं कोहलीची भरभरून स्तुती केली आहे. पण एक विक्रम तो मोडू शकत नसल्याचे तो यावेळी म्हणाला आहे. सचिनच्या नावावर २०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आहे. हा विक्रम कोणी मोडेल असे वाटत नाही, असे सेहवाग म्हणाला. यामुळे क्रीडा वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Exit mobile version