Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निरीक्षकांनी तपासला उमेदवारांच्या खर्चाचा तपशील

DIO 1

जळगाव प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवडणूक खर्च निरिक्षकांनी आज मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या हिशोब नोंदवह्या तपासल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनमध्ये आज सकाळपासून जळगांव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरिक्षक वेणूधर गोडेसी आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरिक्षक मधुकर आंनद यांच्या उपस्थितीत जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांच्या खर्चाच्या हिशोब नोंदवही (शॅडो रजिस्टर) ची तिसरी तपासणी आज सुरु करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी निवडणूक खर्च नियंत्रण व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पंडित, खर्च निरिक्षकांचे संपर्क अधिकारी तुषार चिनावलकर, डी. बी. बेहरे, विनोद चावरीया, लेखाधिकारी श्री. देशमुख, पी. पी. महाजन, पी. पी. सोनवणे, विलास पाटील, कपील पवार यांच्यासह निवडणूक खर्च शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी निवडणूक खर्च निरिक्षक यांनी मतदारसंघहनिहाय उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यापासून आतापर्यंतच्या खर्चाच्या हिशोब नोंदवह्या, बँकेचे पासबुक, रोखीने करण्यात आलेला दैनंदिन आर्थिक व्यवहार, खर्चाचा ताळमेळ करतांना दाखविण्यात आलेली बीले, आदिची तपासणी केली. त्याचबरोबर निवडणूक खर्च शाखेकडे सादर केलेल्या बीलांचा ताळमेळ, जाहिरात प्रमाणीकरण समितीने सादर केलेले खर्चाचे विवरण उमेदवारांनी त्यांच्या खर्चात दाखविले किंवा कसे याचीही पडताळणी केली. तसेच पेडन्युजबाबतचीही माहिती जाणून घेतली. तसेच मागील दोन तपासणीच्यावेळी ज्या उमेदवारांच्या हिशोब नोंदवहीमध्ये तफावत आढळून आली आहे. त्यांना देण्यात आलेल्या नोटीसीवर त्याचा खुलासा आदि बाबींची तपासणी करण्यात आली. निवडणूकीनंतर निवडणूक लढविणात्या उमेदवारांच्या अंतिम खर्चाची तपासणी करण्यात येणार असून त्याबाबत संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल, असे केंद्रीय निरीक्षकांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version