Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नितीश कुमार पुन्हा बनणार मुख्यमंत्री; उद्या शपथविधी

पाटणा वृत्तसंस्था । नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून विक्रमी सातव्यांदा धुरा सांभाळणार असून ते उद्या आपल्या पदाची शपथ घेणार आहेत.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी निवड जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची निवड झाली असून ते सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. सोमवारी नितीश कुमार यांचा शपथविधी पार पडणार आहे.

बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी सरकार स्थापनेसाठी नितीश कुमार यांना निमंत्रण दिलं आहे. नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात पोहोचले होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. भाजापमधून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटत होतं. पण भाजपाने केलेल्या आग्रखातर मी मुख्यमंत्री होत आहे.

दरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत मात्र अद्याप माहिती जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी ४.३० वाजता शपथविधी पार आहे. नितीश कुमार सातव्यांदा सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. एनडीएची बैठक आज पार पडली असून त्यानंतर नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Exit mobile version