Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिहार निवडणुकीचे नेतृत्व नितीशकुमारांकडे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

भाजपा प्रदेश कार्य समितीची व्हर्च्युअल बैठकही पार पडली. या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा देखील सहभाग होता. या वेळी नड्डा यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी, संयुक्त जनता दल (जदयू) व लोक जनशक्ती पार्टी एकत्र लढवणार असल्याची घोषणा केली.नड्डा यांनी सांगितले की, भाजपा, जदयू आणि लोक जनशक्ती पार्टी जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा आपलाच विजय झाला आहे.

Exit mobile version