निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील इ. १० वीच्या विदयार्थ्यानी एप्रिल – २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून या गौरवशाली परंपरेत मानाचा तुरा रोवला.

या परीक्षेत एकूण ९९ विदयार्थी प्रविष्ठ झाले होते. शाळेच्या या उत्कृष्ट निकालामुळे पाचोरा, भडगांव, शेंदुर्णी आणि नगरदेवळा परिसरातील व पंचकोशीतील पालकांकडून सर्व यशस्वी विदयार्थ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शाळेत कु. ऋतुजा अर्जुन सावळे – ९७.८० टक्के गुण (प्रथम), कु. लुकेश नितीन भोसले – ९६.४० टक्के गुण (व्दितीय) तर कु. किर्ती इंद्रकुमार वाधवानी ९५.२० टक्के गुण (तृतीय) आली आहे. विशेष म्हणजे दोन विदयार्थ्यानी आणि इशिका अमर कोडवा गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले असून विज्ञान विषयात एका विदयार्थ्याने १०० पैकी १०० गुण मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. ९१ टक्क्यांपेक्षा जास्त १४ विदयार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

या दैदीप्यमान यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे यांनी सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करण्या-या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content