Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्मल इंटरनॅशनल स्कूलची १०० % निकालाची परंपरा कायम

पाचोरा प्रतिनिधी । निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या इ. १० वीच्या विदयार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी मध्ये १२९ विदयार्थी प्रविष्ठ होते. सर्वच विदयार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.  

यात अनुजा चौधरी हिने ९९.६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. प्रांजल राय व  तन्मय माथुरवैश्य ९७.४०  टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु. रिया पाटील व साक्षी देशमुख ९७.४० टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. अनुजा हिस इंग्रजी, विज्ञान, व सामाजिक शास्त्र या तीनही विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे व प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांनी सर्व यशस्वी विदयार्थ्याचे तसेच त्यांना मार्गदर्शन करण्या-या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच परिक्षेत घवघवती यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Exit mobile version