Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्दयतीने कोंबून गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले; पाच गुरांची सुटका

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गिरड रस्त्यावरून छोटा हत्ती वाहनातून निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असतांना गावातील ग्रामस्थांच्या मदतीने वाहन पकडण्यात आले. या कारवाईत पाच गुरांची सुटका करण्यात आली असून वाहन पोलीसांनी जप्त केले आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील गिरड गावातील सरकारी दवाखान्याजवळ छोटा हत्ती वाहन क्रमांक (एमएच ४८ टी ७४०४) यात पाच गुरांना निर्दयतने कोंबून त्यांची कत्तलीसाठी घेवून जात असतांना काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी वाहन थांबवून भडगाव पोलीसांना कळविले. त्यानुसान पोलीसानी घटनास्थळी धाव घेवून वाहन ताब्यात घेत पाच गुरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी समीर खान फिरोज खान, गाडी मालक अयुब शेख युसूब शेख दोन्ही रा. पाचोरा, गुरांचे मालक (नाव गाव माहित नाही) आणि प्रभाकर चुडामन पाटील रा. गिरड ता. भउगाव या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हिरालाल पाटील करीत आहे.

Exit mobile version