Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बालपणीच्या मित्रांची ‘ती’ सहल ठरली अखेरची !

whatsapp image 2019 07 20 at 7.31.19 am 201907270176

हडपसर (वृत्तसंस्था) लोनी काळभोर वाक वस्ती येथे पुणे-सोलापूर मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील ९ महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी सर्व यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते आणि आज घरी सर्व येत होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर सोलापूरच्या दिशेने जाणार्‍या एर्टिगा या चार चाकी गाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दुभाजक ओलंडुन ट्रकला समोरच्या बाजूने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 

अपघातात मृत झालेल्यांची नावे:

शुभम रामदास भिसे (वय १९)
विशाल सुभाष यादव ( वय २०)
निखिल चंद्रकांत वाबळे (वय २०)
अक्षय चंद्रकांत शिगे ( वय २०)
ऋषिकेश गणेश यादव ( वय २०)
अक्षय भरत वायकर ( वय २२)
नूरमोहम्मद आबास दाया ( वय २२)
परवेज अशपाक आतार ( वय २१)
जुबेर अजीज मुलाणी (वय २१)

Exit mobile version