Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात निंबध, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कला मंडळ इंग्रजी विभाग व हिंदी विभाग अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्त्व या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक नयना बारी, द्वितीय क्रमांक तेजस्विनी कोलते व तृतीय क्रमांक जयश्री सोळंके या विद्यार्थिनी यश प्राप्त केले. या स्पर्धेचे परीक्षक डॉ. एस. पी. कापडे, डॉ. पी. व्ही. पावरा व प्रा. रजनी इंगळे यांनी केले. सदर स्पर्धेत १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

बेटी बचाव बेटी पढाओ या विषयावर पोस्टर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक रेशमी बारेला, द्वितीय क्रमांक जयश्री सोळंके, तृतीय क्रमांक रश्मी बारेला या विद्यार्थिनी यश प्राप्त केले. या स्पर्धेचे डॉ.संतोष जाधव, डॉ.निर्मला पवार यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. सदर स्पर्धेत ०७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

मतदान जागृती अभियान या विषयावर घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वाती बाविस्कर, द्वितीय क्रमांक जागृती ढागे, तृतीय क्रमांक नयना बारी या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. पी. व्ही. पावरा व प्रा. प्रतिभा रावते यांनी काम बघितले. सदर स्पर्धेत ०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

Exit mobile version