Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिबट्याच्या हल्ल्यात नीलगाय ठार

पाचोरा प्रतिनिधी । कुरंगी तालुक्यातील सोनटेक शिवारात मक्याच्या शेतात बिबट्याने नीलगायवर हल्ला करून ठार केले आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील कुरंगी हद्दीतील सोनटेक शिवारात येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते श्याम बाजीराव पाटील यांच्या मक्याच्या शेतात आज दि. २१ रोजी दुपारच्या सुमारास एका बिबट्याने निलगाईवर हल्ला करत ठार केल्याची घटना घडली आहे. याबाबत शेतकरी श्याम पाटील यांना आवाज आल्याने ते त्या दिशेने गेले असता बिबट्याने त्यांचेवर ही हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला.

मात्र वेळीस श्याम पाटील यांनी आरडाओरड करत घटनास्थळावरून पळ काढल्याने बिबट्या तेथुन पसार झाला. याबाबत ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला घटने विषयी माहिती दिली असुन वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

 

 

Exit mobile version