Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निलेश राणेंचे आता आदित्य ठाकरेंवर शरसंधान

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी डान्स बार सुरू करण्याच्या निर्णयावरून आता आदित्य ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे.

माजी खासदार नीलेश राणे यांनी अलीकडेच आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत वादग्रस्त विधान केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे राज्यभरात शिवसैनिकांनी काही ठिकाणी त्यांचे पुतळेही जाळले होते. हा वाद मिटत नाही तोच आता नीलेश राणे यांनी एका ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका करत थेट आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. या ट्विटमध्ये नीलेश राणे म्हणतात, छोटा पेंग्विन खूश असेल, त्याच्या मुंबई नाइट लाइफची मागणी त्याने देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार चालू झाले.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाइट लाइफला परवानगी मिळावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. मुंबई रात्रभर जागी असते. उद्योग आणि सेवाक्षेत्र झपाटयाने विकसित होत आहे. शहराचे राहणीमान बदलत चालले आहे. त्यामुळे कॅफे, दूध केंद्रे, औषधांची दुकाने, मॉल, रेस्तराँ रात्रभर सुरू ठेवावे, अशी त्यांनी मागणी केली होती. रात्रभर मुंबईसाठी अनिवासी भागाचा विचार व्हावा, असे त्यांचे म्हणणे होते. हाच संदर्भ घेऊन राणेंनी आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले आहे.

दरम्यान, नीलेश राणे यांनी आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये अनिल परब आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. यात ते म्हणतात की, स्क्रिप्ट लिहायचं काम संजय राऊत यांचे आहे. स्वतःकडून प्रश्‍न सुटत नाही आणि दुसर्‍याने सोडवले की सहन होत नाही. ह्या स्वभावाला चिंधीगिरी म्हणतात, असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version