Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांनी सावद्यासाठी लवकरच नवीन पाणी पुरवठा योजना !

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी सावदा शहरासाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

सावदा शहरातील सध्या सुरू असलेली पाणी पुरवठा योजना जुनी झाल्याने अनेक ठिकाणी ती वारंवार लिकेज होते यामुळे अनेक वेळा शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो उन्हाळ्यात तर ही समस्या आणखीनच बिकट होते तसेच शहराची वाढती लोकसंख्या व विस्तारलेले क्षेत्र लक्षात घेता येथे नव्याने सुधारित पाणी पुरवठा योजना असावी अशी अनेक दिवसा पासूनची शहरातील नागरिकांची मागणी होती व लवकरच आ. चंद्रकांत पाटील यांचे पाठपुराव्या मुळे येथील नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर होणार असल्याचे संकेत मिळाले आहे,

सावदा येथील ही नवीन पाणी पुरवठा योजना ही अंदाजित, २० कोटी रुपयांची असेल. यामध्ये मांगलवाड़ी ते सावदा फिल्टर प्लॅन्ट पर्यंत नवीन स्वरूपाची पाईप लाईन टाकणे, संपूर्ण शहराची नविन पाईप लाईन टाकणे, मांगलवाडी येथील नवीन जॅकवेल टाकणे, सावदा येथील कन्याशाळा येथील भागात ४.५० लक्ष लिटरची एक नविन पाण्याची टाकी करणे अश्या स्वरूपाची ही योजना असून मागील ५ वर्षापासून ही नविन पाणी पुरवठा योजना प्रलंबीत होती. ही योजना लवकरात लवकर मंजूर व्हावी म्हणून सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक फिरोजखान पठाण, व शिवसेना शहर प्रमुख, शिंदे गट सूरज परदेशी यांनी आ. चंद्रकात पाटील यांना निवेदन सादर केले होते या निवेदनाची त्यांनी त्वरित दखल घेतली,

दरम्यान, या नवीन पाणी पुरवठा योजने बाबत आ. चंद्रकांतभाऊ पाटील यांनी या विषया संदर्भात निवेदन केले. सदर निवेदन सादर केल्याबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकार्‍या सोबत मिटिंग होऊन त्वरीत यास तंत्रिक मंजुरी मिळाली पुढील महिन्यात पाणी पुरवठा मंत्री तथा मुख्यमंत्री यांचे सोबत सभेत चर्चा होणार असून लवकरच या कामास प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. दरम्यान, सावदा येथील गेल्या अनेक वर्षा पासूनची मागणी असलेली नवीन पाणी पुरवठा योजना आ. चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्नाने मार्गी लागणार आहे.

Exit mobile version