फैजपूर पोलीस दलात नवीन चारचाकी वाहन दाखल

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | येथील पोलीस दलास जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नवीन चारचाकी बोलेरो वाहन मिळाले असून याचे विधीवत पूजन करून सेवेत दाखल करण्यात आले.

शहरासह परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना जलद गतीने गुन्ह्याचा तपास लागावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून फैजपूर पोलीस स्टेशनला नवीन वाहन प्राप्त झाले. फैजपूर पोलीस स्टेशनला एकूण २८ गावे लागून आहेत यात काही गावे मोठे आहे. जुने वाहन बर्‍याच वर्षांपासून असल्याने वारंवार दुरुस्तीला खर्च लागत होता. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कडे पोलीस स्टेशनला नवीन वाहनांची मागणी केली होती त्यानुसार आधी १४ पोलीस स्टेशनला एप्रिल महिन्यांत नवीन चारचाकी वाहन देण्यात आली होती. यात फैजपूर पोलीस स्टेशनचा समावेश नव्हता या पोलीस स्टेशनला ३ ऑक्टोबर रोजी नवीन वाहन मिळाले.
यावेळी अनिल नारखेडे यांच्यासह संपूर्ण पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

यानंतर या वाहनाची पूजा एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर यांनी केली. या माध्यमातून बोलेरो वाहन फैजपूर पोलिसांच्या सेवात दाखल झाले आहे. या संदर्भात फैजपूर स्थानकाचे एपीआय सिध्देश्‍वर आखेगावर म्हणाले की, फैजपूर पोलीस स्टेशनला गेल्या महिन्यातच रुजू झालो होतो. त्यातच माझ्या कारकिर्दीत नवीन वाहन मिळाले याचा आनंद आहेच पण या वाहनामुळे रात्रीची गस्त सुलभ होणार आहे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेव्यासाठी या वाहनाची मदत होणार आहे.फैजपूर शहर हे भौतिकदृष्टया महत्वाचे आहे. पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या आदेशानुसार नवीन चारचाकी वाहन फैजपूर पोलीस स्टेशनला प्राप्त झाले असल्याचे ते म्हणाले.

Protected Content