Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंपळगाव हरेश्वर येथे नुतन वास्तू उद्घाटन सोहळा व सत्कार समारंभाचे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ग्राम विकास मंडळ संचलित खाजगी प्राथमिक विद्या मंदिर, पिंपळगाव (हरेश्वर) येथील नवीन वास्तूचे उद्घाटन व ग्राम विकास कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र चिंचोले यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार व गौरव समारंभ दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगांव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते होणार असून पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप वाघ हे आहेत. तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष अमोल  शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, पंचायत समितीच्या उपसभापती रत्नप्रभा पाटील हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन व प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल हे आहेत.

सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष देविदास महाजन, चिटणीस रवींद्र जाधव, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य प्रमोद महाजन, मुख्याध्यापक शशिकांत महालपुरे, शेवंताबाई नाईक, साईदास राठोड, स्वागत समिती सदस्य संजय झेरवाल, संजय पाटील, अर्जुन सावळे, मनोज सोनवणे, संदीप पाटील, रणजित देशमुख, परेश पाटील, अर्चना चव्हाण, मीरा पाटील, संगीता पवार यांनी केले आहे.

 

 

Exit mobile version