Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनलॉकचे नवीन नियम लवकरच होणार जाहीर

नवी दिल्ली । केंद्र सरकार लवकरच अनलॉक ४.० जाहीर करणार असून यात चित्रपटगृहांसह अन्य बाबींना खोलण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकार अनलॉक ४.० जाहीर करण्याची शक्यता आहे. यात मेट्रो, सिनेमा टॉकिज, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, असेंब्ली हॉल आदींपैकी काहींना परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय सामाजिक, राजकीय सभा, केळ, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत यापैकी काही गोष्टी खुल्या होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये १ सप्टेंबरपासून मेट्रो सुरु करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत विमानोड्डाणे पूर्णपणे सुरु होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशातील सिनेमागृहे देखील टप्प्याटप्प्याने सुरु होण्याची शक्यता आहे. शुटिंगवेळी सेटवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आदेश आहेत. चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी नियमावली बनविली जात आहे. ही नियमावली शेवटच्या टप्प्यात असल्याचे सुत्रांनी सांगितले.

तथापि, अनलॉक ४.० मध्ये केंद्र सरकार शाळा उघडण्याला परवानगी देण्याची शक्यता नाही. कोरोनाची लस आल्याशिवाय ही बाब शक्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, आयआयटी, आयआयएमसह सर्व कॉलेज आणि विद्यापीठे सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version