Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नूतन पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी स्वीकारला पदभार

81517246 6256 46b7 a664 803d78acc05c

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची नुकतीच बदली झाली होती. त्यांच्या जागी नाशिकला कार्यरत असणारे पंजाबराव उगले यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, आज दुपारी मावळते पोलीस अधीक्षक शिंदे यांच्याकडून नूतन पोलीस अधीक्षक यांनी पदभार स्वीकारला आहे.

 

अवघ्या सहा-सात महिन्यांपूर्वी जळगाव पोलिस अधीक्षकपदी बदलून आलेल्या दत्ता शिंदे यांची नुकतीच बदली झाली होती.शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी झालेले विमानतळ चित्रीकरणाचे प्रकरण त्यांना भोवल्याचेही बोलले जात आहे. नूतन पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले हे नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत होते.

Exit mobile version