Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसर्‍या क्रमांकावर !

मुंबई प्रतिनिधी । स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० मध्ये नवी मुंबईने देशातील तिसर्‍या क्रमांकाचे स्वच्छ शहराचे मानांकन मिळविले आहे. या यादीत इंदूर पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर तर सुरत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ङ्गस्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०फ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर तिसर्‍या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसर्‍या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे.

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२० साठी स्वच्छता अ‍ॅपवरुन १ कोटी ७० लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मीडियावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला. तर साडे पाच लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडण्यात आलं.

याआधी ङ्गस्वच्छ भारत मिशनफअंतर्गत कचरामुक्त शहर मोहिमेत देशातील पाच शहरांत नवी मुंबईला स्थान मिळाले होते. यावेळी नवी मुंबईला पंचतारांकित दर्जा मिळाला होता. देशातील पाच शहरांत नवी मुंबईचा समावेश झाला होता. यंदा देखील नवी मुंबईने हा दर्जा मिळवला होता.

Exit mobile version