Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेस अश्‍लील शिवीगाळ करून धमकी : राऊतांच्या विरूध्द गुन्हा दाखल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली असतांनाच महिलेला अश्‍लील शिवीगाळ करून धमकावल्याच्या प्रकरणात त्यांच्या विरूध्द अजून एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संजय राऊत यांची एक ऑडिओ क्लीप दोन दिवसांपूर्वीच व्हायरल झाली होती. याच प्रकरणी ते आता नव्याने गोत्यात आले आहेत. यात स्वप्ना पाटकर यांना राऊत हे धमकावत असल्याचे दिसून आले होते. धमकावल्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलीस ठाण्याच राऊतांवर गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणी आधी. स्वप्ना पाटकर यांनी धमकावल्याची तक्रार केली होती. त्यावर शनिवारी राऊतांवर एनसी दाखल करण्यात आली होती. मात्र किरीट सोमय्या यांनी काल पोलीस ठाण्यात धाव घेऊन एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर राऊतांवर ५०४ आणि ५०९ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली. यामुळे राऊत हे पुन्हा एकदा गोत्यात आल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version