Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निर्यातीचा नवा विक्रम : ३३१ अब्ज डॉलर्स

download 7

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील निर्यातीबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. भारताने निर्यात व्यापारात दमदार कामगिरी केल्याचे समोर आले आहे. सरत्या आर्थिक वर्षात निर्यातीत ९ टक्के वाढ वाढ झाली असून ३३१ अब्ज डॉलरपर्यंत व्यापार पोहचला आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये नोंदवण्यात आलेल्या निर्यातीचा विक्रम यंदा मोडीत निघाला आहे.

 

आर्थिक मंदीच्या वातावरणात २०१८-१९ या वर्षात ३३१ अब्ज डॉलर व्यापाराची नोंद करण्यात आली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. मार्च महिन्यात निर्यात व्यापारात ११ टक्के वाढ झाली. ऑक्टोबर २०१८ नंतर एका महिन्यात सर्वाधिक मोठी वाढ मार्चमध्ये नोंदवण्यात आली. ऑक्टोबरमध्ये १७.८६ टक्के वाढ नोंदवण्यात आली. फार्मा, केमिकल, अभियांत्रिकी क्षेत्रातील वाढीमुळे एकूण निर्यात व्यापारात वाढ झाली आहे.

निर्यात व्यापारात आणखी वाढ करण्यासाठी सरकारने खाद्य पदार्थ किंवा तत्सम पदार्थ आणि पारंपरिक वस्तूंच्या निर्यातीवर लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत ट्रेड प्रमोशन कौंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंघला यांनी व्यक्त केले. नवीन सरकार व्यापार निर्यातीवर आणखी लक्ष केंद्रीत करुन नवीन धोरण ठरवेल असा विश्वासही सिंघला यांनी व्यक्त केला.

निर्यातदारांची संघटना ‘फीयो’चे अध्यक्ष गणेश कुमार गुप्ता यांनी सांगितले की, निर्यातीमध्ये जागतिक आणि देशातंर्गत अडचणी निर्माण झाल्या होत्या. तरीदेखील निर्यात व्यापारातील वाढ सकारात्मक आहे. तरीदेखील सरकारने जीएसटीमध्ये सवलत व इतर काही सवलती, योजना आणणे आवश्यक असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. चीन व दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये होणाऱ्या उत्पादनांवर जागतिक मंदीचा परिणाम झाला आहे. मात्र, भारताने जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर चांगली निर्यात केली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

Exit mobile version