Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयएमए जळगाव शाखेची नवीन कार्यकारीणी जाहीर

ima indian medical association

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए जळगाव शाखेची नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वार्षीक सर्वसाधारण सभेचे डॉ. सी. जी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले. सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा मांडला. डॉ. सी जी चौधरी, डॉ. आठवले, डॉ. अनिल पाटील, डॉ. सिकची, डॉ. राजेश पाटील, डॉ. स्नेहल फेगडे आदींनी डॉ. चौधरी यांच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले.

दरम्यान, या बैठकीत आयएमएच्या जळगाव शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. त्यात अध्यक्षपदी डॉ. दीपक आठवले, उपाध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, सचिवपदी डॉ. जितेंद्र कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली. खजिनदार डॉ. पंकज पाटील, सहसचिव डॉ. सुशिलकुमार राणे, डॉ. धीरज चौधरी, पीआरओ डॉ. विनोद जैन, सदस्य डॉ. राहुल मयुर, डॉ. पंकज शाह, डॉ. दीपक पाटील, डॉ. सारीका पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. अनघा चोपडे यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. नवीन पदाधिकार्‍यांचा ३ एप्रिल रोजी पदग्रहण सोहळा होणार आहे. बैठकीचे सुत्रसंचालन खजिनदार डॉ. भरत बोरोले यांनी केले.

Exit mobile version