Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा तालुका शेतकरी संघटनेची नुतन कार्यकारिणी जाहीर

पारोळा प्रतिनिधी । शेतकरी संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक व श्री छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पृथ्वीराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पारोळा तालुका शेतकरी संघटनेची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.  शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून किशोर पाटील जोगलखेडा यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. 

यांची झाली निवड

पारोळा तालुका शेतकरी संघटनेच्या जेष्ठ मार्गदर्शक पदी सर्वानुमते डॉ.पृथ्वीराज पाटील टोळी यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी दत्तु पाटील मंगरूळ, सचिवपदी नितीन देसले आंचळगाव, सहसचिव पदी भुषण पाटील ढोली, शेतकरी संघटना प्रवक्ता म्हणून भिकनराव पाटील रत्नापिंप्री, कृषी योजना सल्लागार पदी सतिष काटे कोळपिंप्री, विमा सल्लागारपदी अधिकार पाटील भोंडन, वैद्यकीय आघाडी पदी डॉ.शरद बागुल तामसवाडी, संघटन प्रमुखपदी महेंद्र पाटील हिरापूर, सहसंघटन प्रमुखपदी वाल्मीक पाटील टोळी, समन्वयक पदी संतोष महाजन शिरसमणी, सहसमन्वयक पदी निरंजन पाटील शिरसमणी, प्रसिद्धी प्रमुख म्हणून मनोहर केदार लोणी, जेष्ठ सल्लागार म्हणून यशवंत पाटील बाहुटे, डिगंबर पाटील शेवगे, के.एन.पाटील पारोळा यांची निवड करण्यात आली.

मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करतांना डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तळागाळातील शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेमध्ये सामावून घेण्यासाठी खेड्यापाड्यात शेतकरी संघटनेच्या शाखा सुरु करण्याचे मनोगत व्यक्त केले. डॉ.पाटील व शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सर्वस्व पणाला लावून काम करेल, अशी अपेक्षा पारोळा तालुक्याचे स्विकृत नगरसेवक पी.जी.पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून सरकार दरबारी न्याय मागण्यांसाठी आंदोलन करण्याची तयारी दर्शवली. शेतकरी संघटनेचे प्रवक्ता भिकनराव पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन आभार मानले.

 

 

Exit mobile version