Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना पॉझिटीव्हचा नवीन उच्चांक : जिल्ह्यात ६०५ बाधीत रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये अमळनेरात एकाच दिवशी तब्बल ६०५ आढळून आले आहेत. जिल्ह्यात दुसर्‍यांदा सहाशे पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले असून यात आजची संख्या उच्चांकी आहे. तर जिल्ह्यात जळगाव शहरासह तालुका, चोपडा, भडगाव, एरंडोल व चाळीसगावात संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ६०५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक ९२ रूग्ण हे चोपडा तालुक्यात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल जळगाव शहर-९० तर जळगाव ग्रामीण-७२ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.

संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-९०; जळगाव ग्रामीण-७२; भुसावळ-१८; चोपडा-९३; पाचोरा-९; भडगाव-६१; धरणगाव-१७; यावल-१०; एरंडोल-८२; जामनेर-१७; रावेर-३०; पारोळा-७; चाळीसगाव-६७; मुक्ताईनगर-१; बोदवड-१२ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ७ असे रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या १९६८७ इतकी झालेली आहे. यातील १३५२७ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ३५१ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १० मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ६८८ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ५४७२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner

Exit mobile version