Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Breaking : नेरी नाक्यावर छेड काढण्यावरून एकाला चोपले !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नेरी नाका येथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की करून विनयभंग व धमकी देणाऱ्या व्यक्तीला गर्दीतील नागरीकांकडून चोप दिल्याची घटना सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी ह्या गुरूवार १७ मार्च रोजी शहरातील नेरी नाका येथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी ड्युटीवर होत्या. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सलीमखान आरमानखान पठाण (वय-५१) रा. पाळधी मोहल्ला ता. धरणगाव हा महिला पोलीस कर्मचारी यांच्याकडे आला. व मनीषा मॅडमचा मोबाईल नंबर द्या असे सांगितले. आपल्याकडे मनीषा मॅडमचा मोबाईल नंबर नसल्याचे महिलेने सांगितले. याचा राग आल्याने सलीमखान हा महिला पोलीसाच्या अंगावर धावून आला. आणि ‘मी रिपोर्टर आहे, मी तुझी नोकरी घालवतो, तुझा साहेब मला सलाम करीन’ अशी धमकी दिली. कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारीचा हात पकडून तसेच तिचा मोबाइलमध्ये फोटो काढल्यावरुन गोंधळ निर्माण झाला. याबाबत महिला पोलिस कर्मचारी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फोनकरून पोलीस कर्मचाऱ्यांना यांना बोलावून घेतले. यावेळी शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोहेकॉ सविता परदेशी, पो.कॉ.किरण मराठे, पोकॉ. रतिलाल पावरा, पो.कॉ. राहुल पाटील यांनी धाव घेतली. त्यावेळी त्या इसमाला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यापूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरीकांकडून त्याला चांगला चोप देण्यात आला. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात संशयित आरोपी सलीम खान आरमानखान पठाण (वय-५१)  राहणार मोहल्ला तालुका धरणगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनिपेठ पोलिस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version