Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नेरी दिगरला गॅस कटरच्या मदतीने एटीएम फोडले; ४३ हजाराची रोकड लंपास

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील टाटा इंडीकॅश कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने फोडून ४३ हजार ५०० रूपयांची रोकड लांबविली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हकीकत अशी की, जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील ईश्वरलाल मगनलाल कुमावत यांचे शॉपींग कॉम्प्लेक्स आहे. या ठिकाणी टाटा इंडिकॅस कंपनीने एटीएम बसविण्यात आले आहे. ३१ मे रोजी रात्री १० ते १ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने एटीएम फोडले. एटीएम मधून ४३ हजाराची रोकड लांबविल्याचे उघडकीला आले. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथेही युनियन बँकेचे एटीएम यांच पध्दतीने फोडून सुमारे ९ लाख ५५ हजारा रूपयांचा मुद्देमाल लांबविल्याच्या घटना देखील उघडकीला आली आहे. या दोन्ही घटनेतील गुन्हेगार हे एकच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी धाव घेवून पाहणी केली व चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. शिरीषकुमार पाटील रा. ममुराबाद जळगाव यांच्या फिर्यादीवरू जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील ताास पोलीस उपनिरीक्षक निरी मोहिते करीत आहे.

 

Exit mobile version