Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ना RRR, ना काश्मीर फाईल्सचा समावेश; ऑस्करसाठी भारतातून ‘छेल्लो शो’चा अधिकृत प्रवेश

लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यंदाच्या २०२३ च्या नामांकनांचे निकाल जाहीर करण्यात आले असून या वर्षी ऑस्कर पुरस्कारासाठी भारताच्या अधिकृत प्रवेशासाठी गुजराती चित्रपटछेल्लो शोची निवड करण्यात आली आहे निवडला गेला आहे. 

अनेक दिवसांपासून सिनेप्रेमींमध्ये सुरु असलेल्या ऑस्करच्या शर्यतीत एसएस राजमौलींच्या RRR की विवेक अग्नीहोत्रींच्या काश्मीर फाईल्स हा चित्रपट निवडला जाईल या चर्चेला पूर्णविराम लागला असून  या सर्वांना मागे टाकत छेल्लो शोने बाजी मारली आहे.

पॅन नलिन दिग्दर्शित छेल्लो शो हा एक गुजराती चित्रपट असून चित्रपटाची कथा चित्रपटावर अफाट प्रेम असणाऱ्या एका ग्रामीण भागातील नऊ वर्षाच्या मुलाभोवती फिरते. या चित्रपटामध्ये भावेश श्रीमाली, भाविन राबरी, ऋचा मीणा, परेश मेहता आणि दीपेन रावल यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Exit mobile version