Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘टॉप-१०’ धनाढ्य महिलांच्या यादीत नेहा नारखेडे !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हुरून इंडिया या ख्यातप्राप्त संस्थेने देशातील टॉप-१० धनाढ्य महिलांची यादी जाहीर केली आहे. यात नेहा नारखेडे या मराठमोळ्या तरूणीचा समावेश असून त्यांचे जळगाव जिल्ह्याशी खास कनेक्शन आहे.

नेहा नारखेडे यांची कंपनी काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेतील शेअर बाजारात लिस्ट झाल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. याआधी त्यांना फोर्ब्ससह अनेक ख्यातनाम संस्थांनी कर्तबगार महिलांच्या यादीत स्थान दिले आहे. आता त्यांना पुन्हा एक नवीन बहुमान मिळालेला आहे. ‘हुरुन इंडिया ’ने बुधवारी देशातील धनाढ्य महिलांची यादी जारी केली आहे.यामध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षा रोशन नाडर सलग दुसर्‍या वर्षी सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. याच यादीत नेहा नारखेडे या मराठी तरूणीने पहिल्यांदा स्थान मिळविले आहे. त्यांची मालमत्ता ही १३,३८० कोटी रूपयांचे असून त्या आठव्या क्रमांकावर असल्याचे या यादीतून स्पष्ट करण्यात आले आहे.

नेहा नारखेडे या डेटा स्ट्रीमिंग टेक्नॉलॉजी कंपनी कॉन्फ्लुएंटच्या सहसंस्थापिका लिंक्डइनमध्ये नोकरी केली असून यानंतर त्यांनी कंपनी स्थापन करून शेअर बाजारात याला लिस्ट केले. याच्या आयपीओला उदंड प्रतिसाद लाभला असून यामुळे त्या झोतात आल्या आहेत.

अजून एक विशेष बाब म्हणजे ‘फोर्ब्स’ या ख्यातप्राप्त संस्थेने जुलै २०२२च्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेतील ‘सेल्फ मेड’ धनाढ्य महिलांची यादी जाहीर केली होती. यात देखील नेहा नारखेडे यांना ५७व्या क्रमांकाचे स्थान प्रदान करण्यात आले होते. यानंतर आता त्यांना ‘टॉप-१०’ भारतीय धनाढ्य महिलांमध्ये मिळालेले स्थान हे अतिशय वाखाणण्याजोगे मानले जात आहे.

जळगाव जिल्ह्याचे कनेक्शन !

नेहा नारखेडे यांचे शिक्षण हे पुण्याला झाले असले तरी त्यांचे वडील हे मूळचे मलकापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांचे अनेक निकटचे आप्त हे जळगाव जिल्ह्यात आहेत. पाटीदार समाजाच्या नेहा नारखेडे या आयटी क्षेत्रातील आश्‍वासक चेहरा मानल्या जात असून त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत.

Exit mobile version