नीट-पीजी प्रवेश परिक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या नीट-पीजी प्रवेश परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने आज नीट-पीजी परीक्षांचे निकाल जाहीर केले असून ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती ते त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. यंदा NBE ने विक्रमी 10 दिवसात निकाल जाहीर केला आहे. 21 मे 2022 रोजी परीक्षा घेण्यात आली होती.

निकाल जाहीर झाल्यानंतर आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करून पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, “NEET PG चा निकाल जाहीर झाला असून, NEET-PG उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय त्यांनी विक्रमी दहा दिवसांत निकाल जाहीर केल्याबद्दल @NBEMS_INDIA चेदेखील कौतुक केले आहे.

Protected Content