Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नीरज चोप्राचा सुवर्णवेध : आता बनला वर्ल्ड चँपियन

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ऑलिंपीकमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर आता नीरज चोप्रा याने जागतिक विश्‍वविजेतेपद मिळवत पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावले आहे.

नीरजने मागील आठवड्यात राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला होता. त्याने पावो नुरमी स्पर्धेत रजत पदक पटकावलं होतं. त्यावेळी थोडक्यात त्याचे सुवर्णपदक हुकले होते. मात्र आता फिनलँडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या वर्ल्ड चँपियन्स स्पर्धेत त्याने पुन्हा एकदा सुवर्णपदक पटकावले आहे.

नीरजने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ८६.८९ मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याचा पुढचा प्रयत्न फाऊल ठरला तर तिसर्‍या प्रयत्नात तो भाला फेकताना घरसला. मात्र त्याचा पहिला थ्रो सर्वात दूर गेल्याने त्याला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. केशॉर्न वालकॉटने ८६.६४ मीटरसह सिल्व्हर मेडल आपल्या नावे केलं. तर विद्यमान विश्व चॅम्पियन एंडरसन पीटर्सने ८४.७५ मीटरसह ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. विशेष बाब म्हणजे याच स्पर्धेत गेल्या वर्षी नीरजचा तिसरा क्रमांक होता. आता मात्र त्याने पहिल्या क्रमांकावर मुसंडी मारली आहे.

Exit mobile version