Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी । राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे आज पहाटे कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले आहे. त्या १९७२ आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या.

नीला सत्यनारायण यांनी कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. नीला सत्यनारायण १९७२ आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. नीला सत्यनारायण यांनी आपल्या कारकिर्दीत मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले होते. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. निवृत्त झाल्यानंतर त्यांची राज्याच्या निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

नीला सत्यनारायण यांचे साहित्य देखील लोकप्रिय झाले होते. हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तकं लिहिली. याशिवाय त्या संवेदनशील कवयित्री म्हणूनही ख्यात होत्या. त्यांच्या निधनाने प्रशासकीय व राजकीय वर्तुळातून संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

Exit mobile version