Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; जिल्हा पोलीस दल आयोजित ‘अमृत दौड’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव  – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने जळगांव जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी अमृत दौडचे आयोजन करण्यात आले होते.

दौडची सुरुवात काव्यरत्नवली चौक येथून करण्यात आली होती. या वेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे, अपार पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, सहायक पोलीस अधीक्षक(गृह) संदीप गावित, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

काव्यरत्नवली चौक येथे झुंबा, योग करीत मान्यवरांच्या हस्ते तिरंगी फुगे हवेत सोडून तसेच हिरवी झंडी देऊन अमृत दौड सुरु झाली. सुमारे ४५७८ जळगावकर नागरिकांनी सहभाग नोंदविला.

देशभक्तीपर गीतांनी परिसर प्रेरणादायी झाल्याची अनुभूती झाली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादाने दौड काव्यरत्नवली चौक- आकाशवाणी चौक- स्वातंत्र चौक- छत्रपती शिवाजी पुतळा- नेहरू चौक- शास्त्री टॉवर चौक- चित्र चौक- शिवाजी पुतळा मार्गे काव्यरत्नवली  चौक येथे दौड संपन्न झाली.

आज सोमवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी पोलीस कवायत मैदान येथून भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन पोलीस प्रशासनातर्फे सकाळी १० वाजता करण्यात आले. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आव्हान पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी केले आहे.

Exit mobile version