Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात भिषण अपघात; उमवि महिला कर्मचारी जागीच ठार, दोन गंभीर

WhatsApp Image 2019 04 05 at 18.30.59

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातून विद्यापिठाकडे रिक्षाने जात असतांना कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा नादात रिक्षाला कंटेनरचा धक्का लागल्याने रिक्षात बसलेल्या तरूणी रोडच्या मध्यभागी पडल्याने कंटेनरच्या मागच्या चाकात आल्याने जागीच ठार झाली. तर सोबत असलेले दुसरी मुलगी व एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना हायवेवरील मराठा मटण हॉटेलजवळ सायंकाळी 5.40 वाजेच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या दोघांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत महिती अशी की, उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील महिला कर्मचारी श्रेया सुनिल कावडे (वय- 26), मिनाक्षी विकास बाविस्कर, विद्यापिठातील कर्मचारी लॅब असिस्टंट परमेश्वर पांडूरंग घाटे हे विद्यापीठाकडून घरी जातांना रिक्षावाल्याने कंटेनरला ओव्हर टेक करत असतांना कंटेनरचा धक्का रिक्षाला लागला. त्यामुळे रिक्षातून श्रेया कावडे ही रस्त्याच्या मध्यभागी पडली. रस्त्यावर पडताच श्रेयाच्या डोक्यावरून कंटेनरचे मागचे दोन्ही चाक गेल्याने ती जागीच ठार झाली. तर मिनाक्षी विकास बाविस्कर व विद्यापिठातील कर्मचारी लॅब असिस्टंट परमेश्वर पांडूरंग घाटे हे गंभीररित्या जखमी झाले. जखमींना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघात होताच परीसरातील नागरीकांना धाव घेतली. झालेल्या या अपघातामुळे सुमारे एक तास वाहतूकी खोळंबा झाला होता.

Exit mobile version