Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर येथे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आदीक यांनी घेतला आढावा बैठक

रावेर प्रतिनिधी । रावेर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची प्रदेश सरचिटणीस अविनाश आदीक यांच्या प्रमुख उपस्थितीत मंथन बैठक घेण्यात आली. आगामी निवडणुकांबाबत ही बैठक होती.  यावेळी बैठकीत पदाधिकाऱ्‍यांना विश्वासघात घेतले जात नसल्याच्या कारणावरुन रात्री काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशा वरुन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस अविनाश आदीक यांनी काल रात्री उशिरा ११ वाजेपर्यंत पक्षाचा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्‍यांनी पक्षातंर्गत कुरखोड्या प्रदेश सरचिटणीस यांच्या समोर मांडल्या. बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासंदर्भात आढावा देखील घेतला. राष्ट्रवादीचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन आदीक यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्यात. लवकरच जिल्हात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हात येणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.

यांची होती उपस्थिती

यावेळी माजी आमदार अरुण पाटील, माजी जि. प. सदस्य रमेश पाटील, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्यध्यक्ष तथा पं.स.सदस्य दिपक पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, शहरध्यक्ष महेमुद शेख, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहरध्यक्ष प्रणित महाजन आदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थितीत होते.

Exit mobile version