Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात ९ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 08 06 at 1.22.37 PM

जळगाव, प्रतिनिधी | ऑगस्ट महिन्यामध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचा शुभारंभ ६ ऑगस्ट रोजी जुन्नर विधानसभा मतदारसंघातील शिवनेरी किल्ला येथून होणार आहे. खानदेशात ही यात्रा ९ ऑगस्ट येणार असून याचे नेतृत्व खा. अमोल कोल्हे करणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी महानगराध्यक्ष नामदेवराव चौधरी, माजी युवक अध्यक्ष ललित बागुल, संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष सेवादल वाय. एस. महाजन, सलीम इनामदार, प्रदेश उपाध्यक्ष मंगला पाटील, महिला अध्यक्ष प्रतिभा शिरसाठ, महानगराध्यक्ष नीला चौधरी, नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या जळगाव शहर अध्यक्षा अश्विनी देशमुख, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, गणेश निंबाळकर आदी उपस्थित होते. संदीप पाटील यांनी पुढे सांगितले की, पहिल्या टप्प्यात ही यात्रा १० तारखेला शिंदखेडा राजा येथे पोहोचेल. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा १६ ऑगस्ट रोजी सकाळी तुळजापूर येथे दर्शन घेऊन पुढे १९ ऑगस्ट रोजी चोंडी येथे अहिल्यादेवी स्मारकास अभिवादन करून रवाना होईल. या शिवस्वराज्य यात्रेचा समारोप २८ ऑगस्ट रोजी रायगड येथे होणार आहे.यात्रेमध्ये एकूण ५५ विधानसभा मतदारसंघात कार्यकम घेण्यात येणार आहेत. या यात्रेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमवेत युवक संघटनेतील किमान दहा कार्यकर्ते सतत राहतील. खानदेशात ही यात्रा धुळे, पारोळा, धरणगाव, पाचोरा ,चाळीसगाव येथे ९ ऑगस्ट रोजी दाखल होणार आहे. शिवस्वराज्य यात्रा डॉक्टर, वकील, शिक्षक, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी वर्ग व सामान्य नागरिक यांच्यासमोर सुमारे एक तासाचा संवाद कार्यक्रम डॉ. कोल्हे घेणार आहेत.

Exit mobile version