Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर

4NCP Logo h01

मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. त्यानुसर मावळमधून पार्थ पवार, शिरुरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनावणे, दिंडोरीमधून धनराज महाले हे उमेदवार आहेत.

एकूण पाचजणांची नावे दुसऱ्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. माढा आणि नगरच्या उमेदवारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. बीडमधून घोषित झालेल्या बजरंग सोनावणे यांच्या नावावरुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा होती. काल लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर झाली होती. ही पहिली यादी असून उर्वरित यादी उद्या आणि परवा घोषित करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी काल सांगितले होते. त्यानुसार आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 10 आणि लक्षद्वीपमधील 1 अशा 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर हातकणंगले लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून राष्ट्रवादी २२ जागा लढवणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

Exit mobile version