Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन

रावेर प्रतिनिधी । पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरुद्ध केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी येथील माजी आमदार पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच विधिमंडळात गुंडशाही करणाऱ्या भाजपच्या निलंबित १२ आमदारांचा निषेध करण्यात आला. यावेळी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, शहराध्यक्ष महेमूद शेख, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, माजी जि प सदस्य रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष गोटू महाजन, सावद्याचे राजेश वानखेडे, शेख सलीम, घनशाम पाटील, विलास ताठे , राजेंद्र चौधरी, किशोर पाटील, पंकज वाघ, माया बारी,  हृदयेश पाटील, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version