Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीच्या कल्पना पाटील यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

29597249 419398081841997 8152952942297572862 n

जळगाव, प्रतिनिधी | आपण संघटना बांधणीसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे कल्पना पाटील यांनी आपल्या महिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा आज शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मागील २ वर्षापासून जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जिल्हाध्यक्ष म्हणून प्रामाणिक काम करून पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, येत्या विधानसभेच्या निवडणुकींच्या दृष्टीने त्या पाहिजे तशी संघटना बांधू न शकल्याने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यापुढे सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कल्पना पाटील यांचे राजीनामा पत्र 

 

Exit mobile version