Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा परिवार संवाद कार्यक्रम उत्साहात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील फैजपुर येथील शुभ दिव्य मंगल कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा परिवार संवाद मेळावा राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष ना . जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

यावेळी यावल व रावेर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे विविध विभागाचे पदधिकारी कार्यकर्तेही मंडळी मोठ्या संख्येने या परिवार संवाद कार्यक्रमास राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष ना . जयंत पाटील , राष्ट्रवादी कॉंग्रेस महीला प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी महसुल मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अँड . रवीन्द्र भैय्या पाटील, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, अहमदनगरच्या आमदार शकसना सलगर, जळगाव जिल्हा महीला आघाडीच्या कल्पनाताई पाटील, राष्ट्रवादीचे हाजी गफ्फार मलिक, रावेर माजी अरूण पाटील , माजी आ.मनिष जैन किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील यांच्यासह पक्षाचे महत्वपुर्ण पदाधिकारी या कार्यक्रमास मोठ्या संख्याने उपस्थित होते. तसेच यावेळी फैजपूर शहरातली स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, नगरसेवक रशिद तडवी, माजी उपनगराध्यक्ष जी पी पाटील, राष्ट्रीवादी शहराध्यक्ष अन्वर खाटीक, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विनोद कोल्हे यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होते

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय पाटील यांनी केलं. या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कौग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले, रावेरचे तालुका अध्यक्ष निळकंठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल आणी रावेर या तालुक्यातील कार्यकर्ते व पदधिकारी यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.

Exit mobile version