Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जनावरांना लाळ खरकुत रोगाचे लसीकरण करण्याची राष्ट्रवादीची मागणी

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय रोगनियंत्रण आरोग्य कार्यक्रम अंतर्गत लाळ खरकुत रोगाचे निर्मूलनसाठी लसीकरण करणे बाबतची मागणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भडगाव तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या आमडदे गावात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात असून येथिल प्रमुख व्यवसाय शेती व शेतील जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यसाय मोठ्या प्रमाणात आहे. येथिल पशुवैदयकीय दवाखान्यात गाय, म्हैस, शेळी, मेंढी, बैल या जनावरांना लाळ, खरकुत आजारावर निर्मूलन करण्यासाठी लसीकरण करने आवश्यक असून दुध उत्पादक शेतकरी बांधवांच्या दुधात घट होत आहे.  तसेच एखादे पशुधन दगावले तर शेतकरी बांधवांला 50 ते 60 हजार रूपये आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकरी या व्यवसायात आहे. त्यातच आजाराचे दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकरी बांधवास नाहक ञास होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक नुकसान होत आहे.  आमडदे गावातील शेतकरी बांधवाकडे बहूतांश दुभत्या जनावराची संख्या मोठी  असल्याने शेतकरी बांधवांच्या मागणी गावात लसीकरणाच्या माध्यमातून या आजाराचे निर्मूलन करावे व लवकर लस मोहीम हाती घेऊन राबवावी, याबाबत सविस्तर मागणी निवेदनाद्ववारे जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली. लवकर याबाबत दखल घेतली जाईल असे आश्वासन पशुसंवर्धन अधिकारी यांनी सांगितले.

Exit mobile version