Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेससह राष्ट्रवादीला तरूण पिढी कंटाळली – जलसंपदामंत्री गिरीश महाजन ( व्हिडीओ )

Girish mahajan

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते विजयसिंग मोहिते-पाटील यांचे चिंरजीव रणजितसिंग मोहिते-पाटील हे भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. रणजिंतसिंग मोहिते पाटील यांच्या मतदार संघात त्यांनी बैठकी घेवूनभाजपा प्रवेश करून राजकरणात प्रवेश करणार असून उद्या अधिकृतरित्या बिनशर्त भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी संपर्क कार्यालयात बोलतांना सांगितले. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचे मोठे नेते व त्यांचे मुले देखील भारतीय जनता पार्टीत येण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत ते भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. आता लोकांचा भाजपावर विश्वास वाढला असून सुशिक्षित पिढी देखील वाढता कल दिसून येत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या राजकारणाला तरूण पिढी पुर्णपणे कंटाळली आहे.

जळगाव मतदार संघासाठी उमेदवार हा निवड समितीच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात भाजपाची उमेदवारांची नावे लवकरच जाहिर होणार आहे. पक्षात मुले पळविण्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावत सांगितले की, आमच्याकडे जवळपास 14 ते 15 दिग्गज नेत्यांची नावे आमच्याकडे आहे. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला द्यावी असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आता हो निर्णय निकाला नंतर कळेलच. महापालिका, जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पुर्णपणे सुपडे साफ आहे. त्याच्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही. एवढया मोठ्या संख्येने भाजपा मागच्या निवडणुकीत निवडून आले. काँग्रेसला नुसता लोकसभा किंवा विधानसभात नुसता भोपळाही फोडता आला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार जळगाव जिल्ह्यात आहे. इतर पक्षांकडे काहिही शिल्लक नाही. एखादा खासदार तर सोडाच किमान आता आमदार विरोधकांनी निवडून दाखवावा. जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारांची नावे आम्ही दिल्ली पाठविलेले नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या अहवालानुसान नावे निश्चित करण्यात येणार आहे.

Exit mobile version