व्यापाऱ्यांच्या बंदला राष्ट्रवादीचा पाठींबा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारच्या जीएसटी धोरणाविरोधात जळगाव शहरातील व्यापा-यांनी पुकारलेल्या बंदला राष्ट्रवादी पार्टी जिल्हा महानगरतर्फे पाठींब्याचे पत्र  व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक धूत यांना देण्यात आले.

पत्राचा  आशय असा की,  सपूर्ण देश महागाईने होरपळत असताना जनतेच्या जखमेवर मीठ चोळप्याचे काम केंद्र सरकारने केले असून शेतकरी पिकवित असलेल्या अन्न धान्यावर जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करून मिळणा-या दुध, दही पनीर अश्या पदार्थावरही जी.एस.टी. कर लावल्याने शेतकरी व व्यापारी हवालदिल झाले आहे.  केन्द्र सरकारने मन मानी कारभार चालवला असून अजून महागाई वाढणार असून सामान्य जनतेचे कंबरडे मोडणार आहे याकरीता केंद्र सरकारने अन्नधान्य खाद्य पदार्थ दूग्धजन्य पदार्थ यावर लावलेला जी. एस. टी.कर रद्द करावा याकरिता जळगाव शहरातील व जिल्हयातील सर्व व्यापाऱ्यांनी आज दि.१६ जुलै २०२२ रोजी शनिवारी बंद चे आयोजन केले आहे.  त्याच्या या निर्णयाला जळगाव शहर (जिल्हा) महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ॲड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील  व महानगर जिल्हाध्यक्ष अशोक  लाडवंजारी यांच्या स्वाक्षरीचे पाठींबा पत्र देण्यात आले. याप्रसंगी राजू मोरे, रमेश बारे, अमोल कोल्हे, किरण राजपूत, राहुल  टोके, चंद्रमणी सोनवणे, सुनील माळी, अशोक सोनवणे आदी उपस्थित होते.

 

Protected Content