Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध आंदोलन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. या घटनेचा पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला असून निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन देण्यात आले.

या हल्या मागे काही राजकीय शक्तीचा हात असून या घटनेचा पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध करत माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली येथील पक्ष कार्यालयापासून तहसील कार्यालयात मोर्चा काढण्यात आला आहे. निवेदनात हल्ले खोरांना अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पाचोरा पोलीस ठाण्यातही निवेदन देण्यात आले व भारतीय जनता पक्ष आणि अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आल्या.

मोर्चात नगरपरीषदेचे गटनेते संजय वाघ, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुरेखा पाटील, नाना देवरे, बशीर बागवान, सुदाम चौधरी, रणजित पाटील, योगेश पाटील, सुदर्शन सोनवणे, हरीष पाटील, जय सुतार, हेमंत पाटील, गणेश पाटील, मयूर पाटील, विनोद पाटील,प्रा माणिक पाटील, धर्मा पाटील, ए. बी. अहिरे, भगवान मिस्तरी, सतिष देशमुख, संजय सुर्यवंशी, सचिन पाटील, रसुल पिंजारी, शशिकांत चंदिले सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version