Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली खडसे यांची भेट

पहूर ,ता.जामनेर( रविंद्र लाठे )  पहूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची मुक्ताईनगर येथे सदिच्छा भेट घेतली.  

एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत असतानाच आज दुपारी साडेचार वाजता माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा , उपसरपंच शामराव सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर येथील फार्म हाऊस येथे त्यांची सदिच्छा भेट घेतली . यावेळी नाथाभाऊंनी त्यांच्याशी दिलखुलास चर्चा केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगीतले आहे. 

 या वेळी माजी उपसरपंच रवींद्र मोरे , ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशिष माळी , सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख , पठाण वायरमन , साकीर शेख , सलीम शहा आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या भेटीची पहूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे .

 

Exit mobile version