Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा ; आज दुपारी शिवसेनेत प्रवेश

B jadhav

 

मुंबई (वृत्तसंस्था) कोकणातील राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. पक्षांतर करताना नियमाप्रमाणे आधी त्यांना विधानभवनात जाऊन विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, जाधव हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

 

 

भास्कर जाधव यांनी आज औरंगाबाद येथे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला. हा राजीनामा तात्काळ मंजूर करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार अनिल परब यावेळी उपस्थित होते. दरम्यान, मुंबईला परतल्यानंतर दुपारी २ वाजता मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. भास्कर जाधव हे मुळात शिवसैनिक. मात्र, काही कारणामुळे वाद झाल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अपक्ष निवडणूक लढविली होती.जाधव सध्या गुहागरचे विद्यमान आमदार होते.

Exit mobile version