राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांना पुन्हा २० मे पर्यत कोठडी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने मलिक यांना २० मे पर्यत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री तथा नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने त्यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल असून ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

या अगोदर नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं होतं. ईडीतर्फे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने मलिक यांच्या आठ दिवसांचीच कोठडी मंजूरी दिली होती.  त्यानंतर आज पुन्हा सुनावणी होती. आजच्या सुनावणीनंतर त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली असून त्यांना पुन्हा २० मे पर्यत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

Protected Content