Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे राष्ट्रवादीची बैठक; शरद पवार यांच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावल येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकी मध्ये खासदार शरद पवार जळगाव येथील स्वाभिमान सभेला यशस्वी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

या बैठकीस यावल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहावे.या नियोजन साठीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावल तालुक्यातून राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित ५ सप्टेंबर रोजी स्वाभिमान सभेला जळगाव येथे मोठ्या संख्येने जाण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अॅड. रोहिणी खडसे  यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या  प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

तसेच जालना येथे मराठा क्रांतीच्या शांततेच्या मार्गाने चालू असलेल्या उपोषणा ठिकाणी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा जाहीर निषेधाचा ठराव करण्यात आला .

यावेळी तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष तथा पक्षाचे प्रवक्ते अतुल पाटील,विजय पाटील , राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष पवन पाटील, एम बी तडवी, बोदडे नाना ,रा यु जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, महिला आघाडीच्या नीलिमा धांडे, अब्दुल सईद शेख, अॅड रियाज पटेल, ललित पाटील ,यशवंत पाटील, मोहसीन खान अशपाक सय्यद,अब्दुल करीम मण्यार अरुण लोखंडे,दीपक तडवी हाजी अकबर खाटीक,हाजी युसूफ खान,विनोद पाटील कासवे,बापू जासुद निलेश बेलदार ,ललित पाटील प्रसन्न पाटील,मयूर पाटील गिरीश पाटील,रोहन महाजन,विलास येवले, सचिन येवले आदी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते .

Exit mobile version