Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोयखेडा दिगर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

शेंदूर्णी प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर ग्रामपंचायतची नुकतीच निवडणूक झाली असून यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला असून कल्पना मेढे(एससी राखीव) यांची सरपंचपदी निवड करण्यात आली असून उपसरपंच पदी सरला कापरे या निवडून आल्या आहेत.

जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर ग्रामपंचायतची नुकतीच निवडणूक झाली असून एकूण ९ सदस्यपैकी ५ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते. यात कल्पना मेढे, सरला कापरे, पूजा काळे, गीतांजली अहिर, शेख गफूर शेख सरदार इत्यादी सदस्यांचा समावेश आहे. सरपंच उपसरपंच निवडीनंतर मोयखेडा ग्रामपंचायत मध्ये महिला राज सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड यांनी नवनिर्वाचित सरपंच कल्पना मेढे, उपसरपंच सरला कापरे नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. यावेळी संजय इंगळे, दादाराव मेढे, दिलिप मेढे, अरुण काळे, भागवत कापरे, नितेश पंडित, युवराज वेताळ, विनोद मोरे, प्रकाश काळे, चंद्रकांत चौधरी, प्रमोद सुरवाडे, उमेश अहिर, रविंद्र काळे, नारायण काळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

 

Exit mobile version